श्रीनिवास खळे

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीनिवास खळे हे मराठी संगीतातले एक अग्रगण्य नाव. मराठी चित्रपट संगीत आणि भावगीत क्षेत्राचा इतिहास श्रीनिवास खळे यांनी शब्दशः घडवला.

खळे यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विनायक काशिनाथ खळे तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे थोरले बंधू काशिनाथ खळे यांच्या प्रेरणेमुळे श्रीनिवास खळे यांनी संगीतक्षेत्रात प्रवेश केला.

मूळचे कोकणातील असलेले खळे कुटुंबिय बडोदे येथे स्थायिक झाले. श्रीनिवास खळे यांचे शिक्षण व संगोपन बडोदे येथेच झाले. बडोद्याच्या संगीत महाविद्यालयातून त्यांनी कंठसंगीताचा डिप्लोमा घेतला.

आग्रा घराण्याच्या, आफताब-ए-मौसिकी उस्ताद फय्याज खानसाहेब यांचा फार मोठा प्रभाव श्रीनिवास खळे यांच्यावर होता. उस्ताद अता हुसेन खान आणि उस्ताद फय्याद खान यांचे पट्टशिष्य आणि आग्रा-अत्रोली घराण्याचे गायनाचार्य पंडीत मधुसूधन जोशी हे खळे यांचे गुरु होते.

खळे यांनी मराठी गीतांना जसा संगीत साज चढवला तसेच त्यांनी हिंदी, बंगाली, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील गीतांनाही आपल्या संगीताने अलंकृत केले. त्यांनी 'यंदा कर्तव्य आहे', 'बोलकी बाहुली', 'पळसाला पाने तीन', 'जिव्हाळा', 'पोरकी', 'सोबती' या मराठी चित्रपटांना संगीत दिले.तसेच त्यांनी 'पाणीग्रहण', 'विदूषक' आणि 'देवाचे पाय' या नाटकांनाही संगीत दिले.

संगीताच्या दुनियेत श्रीनिवास खळे हे खळे काका या नावाने ओळखले जात. अत्यंत मृदू व ऋजु स्वभावाचे खळे काका त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या आदरस्थानी होते. त्यांच्या शिष्यगणांत प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांचा समावेश होतो.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडीत भीमसेन जोशी या दोन भारतरत्न पुरस्कार प्राप्त गायकांकडून 'राम श्याम गुणगान' या हिंदी भजनांच्या आल्बम साठी एकत्र गाऊन घेणारे खळे काका हे एकमेव संगीतकार आहेत.

श्रीनिवास खळे यांना अनेक पुरस्कार मिळाले यात पद्मभूषण पुरस्कार आणि दादासाहेब फाळके ट्रस्ट अवॉर्डचा समावेश होतो. साठ वर्षे संगीतकार म्हणून कार्यरत राहून रसिकांना आपल्या संगीताने भुरळ घालणाऱ्या श्रीनिवास खळे यांचे २ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.

संगीतकार श्रीनिवास खळे यांची रसिकप्रिय गीते :-

अगा करुणाकरा

अजि म्या ब्रह्म पाहिले

अशी नजर घातकीं बाई

आई आणखी बाबा यातून

आई व्हावी मुलगी माझी

आईपण दे रे

आकाशी फुलला चांदण्याचा

आज अंतर्यामी भेटे कान्हो

आज पेटली उत्तर सीमा

आनंदाचे डोही आनंद

आभाळ कोसळे जेव्हा

आह्मां घरीं धन

आला पाऊस मातीच्या वासात

आली आली सर ही ओली

उगवला चंद्र पुनवेचा

उतरली सांज ही धरेवरी

ऊन असो वा असो सावली

एक कोल्हा बहु भुकेला

एक होता काऊ

एकतारि गाते गीत विठ्ठलाचे

एका तळ्यांत होती बदके

ओठांवरती रोज प्रभाती

कन्या सासुर्‍याशीं जाये

कमोदिनी काय जाणे

कर आता गाई गाई

कशी रे तुला भेटू

कशी ही लाज गडे

कसा मला टाकुनी गेला

कळीदार कपूरी पान

काल पाहिले मी स्वप्‍न

काळ देहासी आला खाऊं

किलबिल किलबिल पक्षी

कोणास ठाऊक कसा

कंठातच रुतल्या ताना

खिन्‍न या वाटा दूर

खेळ मांडीयेला वाळवंटी

गडे पाहू नका

गम्माडी गंमत जम्माडी

गेले ते दिन गेले

गोरी गोरीपान फुलासारखी

गोरी बाहुली कुठुन आली

घन बरसत बरसत आले

चुकचुकली पाल एक

चंदाराणी चंदाराणी का ग

चांद भरली रात आहे

चांदण्याची रोषणाई

चांदोमामा चांदोमामा

जपून चाल्‌ पोरी जपून

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय विठ्ठल रखुमाई

जळो रे तुझी होरी

जाहल्या काही चुका

जीवनाची वाट वेडी

जेथें जातों तेथें तूं माझा

जेव्हा तुझ्या बटांना उधळी

जें का रंजलेंगांजले

ज्योत दिव्याची मंद तेवते

टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती

टप टप टप थेंब वाजती

ती रात्र कुसुंबी बहराची

तुज पाहिले असे अन्‌ नशिबात

तू अबोल हो‍उन जवळी मजला

तेजाचा पसारा घेऊन

त्या तुझिया चिंतनात

दाटे कंठ लागे

दावा नयनीं यशोदेचा

दिवसभर पावसात असून

देवा दया तुझी की

देवाघरच्या फुला

देश हीच माता

धरिला वृथा छंद

नको ताई रुसू

निळासावळा नाथ

नीज माझ्या नंदलाला

पहिलीच भेट झाली

पाऊस आला वारा आला

पाण्यातले पहाता प्रतिबिंब

पाण्याहून सांजवेळी

पंढरीचा वास चंद्रभागे

प्रिया तुज काय दिसे

प्रीती सुरी दुधारी

प्रेम हे माझे-तुझे

प्रेम हे वंचिता

फूल ते संपले गंध

बगळ्यांची माळ फुले

बुद्ध हवा का

बोलून प्रेमबोल तू लाविलास

भावभोळ्या भक्तिची

भेटीलागीं जीवा लागलीसे

महाराष्ट्र जय महाराष्ट्र

माझ्या गालाला पडते खळी

मी चंचल हो‍उन आले

मीरेचे कंकण भक्तीचे

मैना राणी चतुर-शहाणी

या गडे हासू या

या चिमण्यांनो परत फिरा

याचसाठीं केला होता अट्टहास

येउनी स्वप्‍नात माझ्या

राजस सुकुमार मदनाचा

रामप्रहरी राम-गाथा

राहिले ओठांतल्या ओठांत

रुसला मजवरती कान्हा

लळा-जिव्हाळा शब्दच

लागती गे काळजाला तीर

लाज राख नंदलाला

लाजर्‍या कळीला भ्रमर

लाजून हासणे अन्‌

वाकल्या दिशा फुलून

विसरशील तू सारे

विहीणबाई विहीणबाई उठा

वैकुंठीचा राणा तूचि

वैष्णवां घरीं सर्वकाळ

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं

शाळा सुटली पाटी फुटली

शुक्रतारा मंद वारा

शोधू नको मना रे

शांती-दीप हा आज

सकल मिळुनि हसुनि

सखी एकलेपणाचा

सर्वसर्व विसरु दे

सहज सख्या एकटाच

साउलीस का कळे

सावळें सुंदर रूप

सोबतीला चंद्र देते

सांग निळ्या निळवंतीला

सुंदर ते ध्यान

स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या

हरिनामवेली पावली विस्तारी

हा मदिर भोवताल

हाचि नेम आतां

हात तुझा हातातुन

हेचि दान देगा देवा

श्रावणात घन निळा

संकलन - स्वप्ना राजेंद्र दिघे