गव्हाची ठुलीसाहित्य : १ वाटी गहू, १ वाटी गूळ , ४ चमचे तूप, ३ वाट्या पाणी, वेलची, जायफळ पूड, थोडसे बदाम​

कृती : २४ तास गहू भिजवावे. दुसऱ्या दिवशी गहू मिक्समध्ये पाणी घालून बारीक वाटावे. सुपाच्या गाळणीने गाळून घ्यावे. (जोपर्यंत पांढरे पाणी किंवा सत्त्व निघत राहील तोपर्यंत)

नंतर सात ते आठ तास न हलवता ठेवून द्यावे जेणे करून गव्हाचे सत्त्व तळाला बसेल. नंतर वरचे पाणी काढून टाकावे. सत्त्व, तूप व चिरलेला गूळ एकत्र करून बारीक गॅसवर सारखे ढवळत राहावे. पाच ते सात मिनिटात पारदर्शक दिसायला लागले कि उतरून घ्यावे व वेलची ,जायफळ पूड टाकून मिक्स करावे वरून थोडे बदामाचे पातळ काप पसरावे व गरम असतानाच ठुली सर्व्ह करावी. थंड झाल्यावर थोडी घट्ट होते.


ठुली ही भरपूर पौष्टिक व सकाळच्या न्याहारीसाठी उत्तम आहे.