गव्हाच्या पिठाची ठुलीसाहित्य : १ वाटी कणीक, २ वाट्या पाणी, १ वाटी दूध, अर्धी वाटी गूळ, २ चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ आणि थोडी वेलची पूड​

कृती : प्रथम कढईमध्ये २ चमचे तूप घालून कणीक चांगली खरपूस भाजून घ्यावी . अर्धीवाटी पाण्यामध्ये ही कणिक एकजीव करून घ्यावी. नंतर पातेल्यामध्ये दिडवाटी पाणी आणि एक वाटी दूध यांचे मिश्रण उकळत ठेवावे ते उकळत असतांनाच त्यात एकजीव केलेले मिश्रण घालावे व चांगली उकळी आल्यावर गूळ घालावा. तो विरघळल्यावर मिश्रण चांगले खदखदले की गॅस बंद करावा व वरून वेलची पूड घालावी, अशी ही लज्जतदार ठुली तयार झाली !

टीप : हि ठुली ६ ते ७ महिन्याच्या बाळाला खूप दूध घालून पातळसर करून भरवता येते. तसेच पचनास हलकी असल्यामुळे वृद्धांना सकस आहार म्हणून उपयोगी आहे.