वालाचे बिरडेसाहित्य : २ वाटी मोड आलेले सोललेले वाल, २ चमचे जिरे, लसूण ८-१० पाकळ्या, अर्धा इंच आले, कोथिंबीर अर्धा वाटी, हळद अर्धा चमचा, तिखट २ चमचे, हिंग, कढीपत्ता, मोहरी, कांदा १, कोकम ४ तुकडे, अर्धी वाटी तेल, ओले खोबरे रस १ वाटी, मीठ, १ चमचा, साखर १ चमचा

कृती : २ वाटी वाल ताटात घेऊन त्यावर हळद, तिखट, जिरे, लसूण, आले कोथिंबीर पेस्ट लावून ५ मिनिटे ठेऊन द्यावी. प्रेशर कुकरमध्ये १/२ वाटीतेल टाकून त्यामध्ये हिंग, मोहरी, कडीपत्ता टाकावा नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. त्यावर वालाचे मिश्रण फोडणीस टाकून परतून घ्यावे. वाल बुडतील इतके त्यात पाणी टाकून कुकरचे झाकण लावावे. १ शिटी झाल्यावर गॅस बारीक करून दिड मिनिटांनी तो बंद करावा. वाफ बसल्यावर त्यात कोथिंबीर, वाटलेले खोबरे रस, मीठ, साखर, कोकम घालून २ वाटी उकळते पाणी घालून मंद आचेवर दोन मिनीटे ठेवावे.गरम गरम सर्व्ह करावे.(कृती साठी अंदाजे वेळ १५ ते २० मिनिटे)