कणकेचा शिरासाहित्य : १ वाटी कणीक, १ वाटी साजूक तूप, पाऊणवाटी साखर, पाऊण वाटी पाणी, थोडी वेलची पूड.

कृती : प्रथम कढईमध्ये अर्धीवाटी तूप घालून कणीक चांगली खरपूस भाजून घ्यावी. कणीक भाजून झाल्यानंतर त्यात पाऊण वाटी साखर व पाऊण वाटी गरमपाणी घालून मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवावे. एक चांगली वाफ आल्यावर त्यावर अर्धीवाटी तूप सोडावे व चांगले ढवळून घ्यावे व वरून वेलची पूड घालावी असा हा लज्जतदार शिरा खाण्यास तयार झाला !


टीप : हा शिरा पौष्टिक आहे व झटपट तयार होतो. मांसाहारी पदार्थाबरोबरही खायला छान लागतो.