सांजणेसाहित्य : अर्धा कि. सांजणी रवा (किंवा इडली रवा), एका नारळाचे दूध, वेलची, जायफळ पावडर, १ वाटी साखर, केशर (किंवा रंग), चिमूटभर मीठ​

कृती : सांजणी रवा एका भांड्यात थोडा गरम करून घ्यावा नंतर १ वाटी रवा नारळाच्या पातळ दुधात शिजवून घ्यावा. रवा मऊसर शिजवावा. नारळाचे दूध काढून घट्ट दूध वेगळे ठेवावे. थोड्या पातळ दुधात १ वाटी साखर घालून साखर विरघळून घ्यावी. त्यात उरलेला रवा व शिजवलेला रवा घालून एकत्र करावे. त्यात थोडे थोडे नारळाचे दूध टाकावे. गुठळ्या मोडून घ्याव्या. हे मिश्रणअर्धा तास तसेच ठेवून द्यावे. मग त्यात मिठाची कणी, वेलची पावडर व जायफळ पावडर घालावी. त्यात थोड्या थोड्या वेळाने दूध घालावे पाळीतून पडेल इतके करावे. दोन भाग करावे. एक भाग पांढरा ठेवावा. दुसऱ्यात केशर रंग किंवा केशर घालावा.

थाळ्यामधे मिश्रण घालून कुकरमध्ये (शिट्टी न लावता ) किंवा ढोकळा स्टँडमध्ये ठेवून वाफ आणावी. दुसऱ्या भागात केशर घालून सांजण करावे त्याला वरून बदामाचे काप लावावे. नारळाच्या गोड दुधाबरोबर सांजणे खावे.