कच्च्या केळ्याची भाजीसाहित्य : ४ मध्यम कच्ची केळी, २ कांदे बारीक चिरलेले, ४ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ व साखर चवीपुरते, कढीपत्ता ८ ते १० पाने, कोथिंबीर, फोडणीसाठी २ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग

कृती : कच्ची केळी साली सकट तुकडे करून उकडून घ्यावीत नंतर त्याची साल काढून केळ्याचा किस करून घ्यावा. पातेल्यात तेल मोहरी, मिरची, कडीपत्ता, हळद व हिंग घालून फोडणी करावी. त्यावर चवीपुरते मीठ, साखर व ओले खोबरे घालावे. सर्व परतल्यावर केळ्यांचा किस घालून परतवावे व वरून कोथिंबीर घालावी.

ही भाजी मधल्यावेळचे खाणे म्हणून सुद्धा छान लागते.