साहित्य : ५ वाट्या जाड रवा, २ वाट्या खवलेला ओला नारळ, ३ वाट्या साखर, ३ टेबलस्पून साजूक तूप

कृती : एका भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये रवा थोडा भाजून घ्यावा व नंतर २ वाट्या ओले खोबरे घालून चांगले खरपूस भाजून घ्यावे व भाजलेला रवा परातीत काढून ठेवावा. भांड्यात ३ वाट्या साखर घेऊन त्यात साखर बुडेल एवढे पाणी घालून एकतारी पाक करावा नंतर आच बंद करून त्यात रवा, वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काप घालून सर्व चांगले घाटून घ्यावे व थोडा वेळ झाकून ठेवावे नंतर पाण्याचा हात लावून लाडू वळावे.

(बदाम, पिस्त्याचे काप ऐच्छिक आहेत.)