निनांवसाहित्य : चार वाटी डाळीचे पीठ, दोन चमचे गव्हाचे पीठ, ३ वाटी नारळाचे दूध, दोन चमचे साय, ४ वाटी गूळ, वेलची जायफळ पूड, साखर ४ चमचे, ४ चमचे तूप, चिमूटभर मीठ​.

कृती : प्रथम जाड बुडाच्या भांड्यात चार चमचे तूप घालून तूप तापल्यावर त्यात डाळीचे पीठ व गव्हाचे पीठ घालून भाजून घ्यावे व थंड करावे. नारळाचे दूध काढावे व थंड झालेल्या पिठात नारळाचे दूध व चिमूटभर मीठ घालावे. साखर घालावी, गूळ किसून घ्यावा व पिठात घालून मिक्स करावा. हे मिश्रण मिक्सरमधून काढावे. म्हणजे पिठात गुठळ्या राहणार नाही. त्यात वेलची, जायफळ पूड घालावी व गॅसवर भांडे ठेवावे व सतत ढवळत रहावे. गुठळी होता कामा नये. कालथ्याला जड लागले की भांड्याखाली जाड तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे. त्यावर ( मिश्रणावर) सर्व बाजूनी साजूक तूप सोडावे. वरती घट्ट झाकण ठेवावे. झाकणावर छोटा खल किंवा वरवंटा ठेवावा. चांगले शिजू द्यावे. यात कालथा घालून पाहावा. कालथ्याला मिश्रण चिकटत नाही हे पहावे. वरती पीठाला तकतकी येते व भांड्याच्या बाजूने सुटले कि निनांव तयार झाले. थंड झाल्यावर त्याच्या जाड वड्या पाडाव्यात.​