नवलकोल (अलकोल) कोशिंबीरसाहित्य : नवलकोल (अलकोल) २, हिरव्या मिरच्या ३ ते ४, शेंगदाण्याचे कूट २ चमचे भरून, १ लिंबाच्या रस, साखर, जिरे, तूप, हिंग फोडणीसाठी, खोबरे, कोथिंबीर

कृती : नवलकोलच्या (अलकोलच्या) साली काढून घ्याव्यात व किसून घ्यावे. एका बाऊलमध्ये मीठ, साखर, दाण्याचे कूट, ओले खोबरे, लिंबाचा सर घालावे व फोडणीच्या पळीत तूप, जिरे, हिंग घालावे व वरील मिश्रणाला फोडणी द्यावी व एकत्र करावे वरून कोथिंबीर घालावी.