खांडवी (नाचणी सत्वाची)साहित्य : २ वाट्या नाचणी सत्त्व, २ वाट्या गूळ, ५ वाट्या नारळाचे जाड दूध, १ टीस्पून जायफळ पावडर, १ टीस्पून वेलची पावडर, चवीपुरते मीठ

नाचणी सत्त्वासाठी : अर्धा किलो नाचणी धुवून दोन दिवस पाण्यात भिजत घालावी. दोन दिवस सकाळ संध्याकाळी त्यातील पाणी बदलत रहावे. तिसऱ्या दिवशी नाचणी पाणी घालून वाटून फडक्यावर अथवा बारीक चाळणीने गाळून घ्यावी. राहीलेला चोथा परत परत दोनदा तरी पाणी घालून वाटावा व गाळून घ्यावा हे सर्व मिश्रण तासभर स्थिर ठेवावे म्हणजे वाटलेल्या मिश्रणातील पाणी वर येते ते काढून टाकावे.तळाशी नाचणीचे सत्त्व रहाते ते सत्त्व दोन वाट्या घ्यावे.


कृती: नाचणी सत्त्व, नारळाचे दूध, गूळ, वेलची-जायफळ पावडर, व मीठ घालून एकत्र करावे. गूळ विरघळल्यावर सर्व उकळण्यास ठेवावे. मिश्रण घट्ट झाले कि भांड्याखाली तवा घालून गॅस लहान ठेवावा व पातेल्यावर झाकणी टाकून वाफ येऊ द्यावी.

खांडवी गार किंवा गरम कशीही छान लागते.