मुगाचे बिरडेसाहित्य : मोड आलेले मूग १ वाटी, १ कांदा बारीक चिरलेला, हळद, धणे, जिरे पावडर, गूळ, मीठ, आमसुले, खोबऱ्याचे वाटण, कढीपत्ता

कृती : भांड्यात तेल टाकणे, तेल तापल्यावर मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग टाकणे त्यावर चिरलेला कांदा टाकणे. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद, तिखट, धणे, जिरे पावडर टाकणे व परतणे. त्यावर मूग घालून चांगले परतून घेणे त्यात पाणी टाकून त्यावर झाकण ठेवणे. मूग चांगले शिजल्यावर त्यात मीठ चवीनुसार गूळ व खोबऱ्याचे वाटण ३ ते ४ आमसुले घालणे. उकळी आणणे व त्यावर कोथिंबीर घालणे.