मसूरी आमटीसाहित्य : रात्रभर भिजवून उपसलेले मसूर २ वाट्या, २ मध्यम बारीक चिरलेले कांदे, हळद, तिखट, धणे जिरे पावडर, मीठ, गूळ, कांदा खोबरे वाटण, दालचिनी तुकडा, आमसुले तीन ते चार, तेल, हिंग.


तळला मसाला साहित्य : उभा चिरलेला कांदा, खोबऱ्याचा किस, थोडे धणे, दालचिनी तुकडा, लवंग, मिरी ४ ते ५, १ बडी वेलची, १ तमालपत्र

कृती : कांदा तेलात चांगला तपकिरी रंगावर करणे नंतर खोबरे लालसर भाजून घेणे. धणे, दालचिनी, मिरी, लवंग, बडीवेलची, तमालपत्र भाजून घेणे. मिक्सर मधून बारीक वाटणे. भांड्यात तेल टाकून त्यावर मोहरी, जिरं, दालचिनी तुकडा व हिंग टाकणे. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर झाल्यावर त्यात हळद, तिखट, धणे,जिरे पावडर टाकणे व परतणे. त्यात मसूर टाकून चांगले परतणे. मसूर बुडेपर्यंत पाणी घालणे झाकण ठेवणे. मसूर शिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ, गूळ, तळलेला कांदा, खोबरे वाटण, आमसूल घालणे. उकळी येऊन देणे त्यावर कोथिंबीर घालणे.