करंदीचे पॅटिसकृती : कढईत थोडे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात फोडणीला बारीक चिरलेला लसूण व हिंग टाकावे. करंदीला हळद, तिखट, मीठ, आल्या, लसणाचं वाटण लावून घ्यावे. तेलावर लसूण लाल झाल्यावर त्यात कांदा टाकावा. कांदा लाल झाल्यावर त्यात करंदी घालावी. नंतर त्यावर लिंबू पिळावे. गरम मसाला घालून करंदी शिजवून कोरडी करावी.

बटाटे उकडून सोलून, एकजीव करून घ्यावे त्यात पावाचा चुरा, आले लसूण गोळी व मीठ घालून बटाट्याचा गोळा करून घ्यावा.त्याचे लिंबाएवढे गोळे करून त्यांना वाटीसारखा आकार देऊन त्यात करंदी भरावी.नंतर हे बटरच्या चुऱ्यात घोळवून तेलावर फ्रायपॅनवर तळावे. खाण्यास रुचकर लागतात.

साहित्य : १ वाटी सोललेली करंदी, २ कांदे, आले १ मोठा तुकडा, १० ते १२ लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, तिखट, आवडीनुसार मीठ, १ चमचा गरम मसाला, पावाचे ४ स्लाईस, ६ ते ७ बटाटे, बटरचा चुरा