बोटव्याची खीरसाहित्य : कणिक, दूध, साखर, वेलची पूड, केशर, बदाम, पिस्त्याचे काप

कृती : कणिक थोडे दूध घालून घट्ट भिजवावी. नंतर त्याला जरा तुपाचा हात लावावा. एक ताटलीत थोडी कणिक भुरभुरावी व त्यावर बोटवी वळावी. थोडी थोडी कणिक घेऊन त्याची बारीक बोटवी वळावी. ती पंख्याखाली वाळवून घ्यावी व तव्यावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. दूध थोडे आटवून घ्यावे व त्यांत बोटवी घालून चांगले उकळवावे नंतर त्यात केशर, वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काप टाकावे. जशी गोड हवी असेल त्या प्रमाणांत साखर घालावी व गरम गरम खायला द्यावी.