बोटव्याचा शिरासाहित्य : एक वाटी गव्हाच्या पिठाचे बोटवे, एक वाटी खवणलेले खोबरे, एक वाटी गरम दूध, पाऊण वाटी साखर, तूप पाच चमचे, वेलची पावडर अर्धा चमचा, ड्रायफ्रुट पावडर एक चमचा (काजू-बदाम पावडर)

कृती: बोटव्याची कृती : गव्हाच्या पिठात १ चमचा तूप व भिजवण्यापुरते दूध घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे व बोटांनी त्या पिठाचे बारीक बारीक बोटवे करावे.


बोटव्याच्या शिऱ्याची कृती : वरील प्रमाणे केलेले बोटवे हलके भाजून घ्यावे त्यानंतर एका कढईत तूप घालून तापलेल्या तुपात ते घालावे त्यानंतर त्यात खवणलेले खोबरे घालावे व हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे त्यानंतर त्यात गरम दूध घालावे. दूध घातल्यावर मिश्रण फुलून येईल मग त्यात साखर घालून व्यवस्थित घाटून घ्यावे व निमरत टाकावे. चांगली वाफ आल्यावर त्यात वेलची पावडर व ड्रायफ्रुट पावडर टाकावी व आपल्या आवडीप्रमाणे सजावट करून बोटव्यांचा शिरा सर्व्ह करावा.