भरलेली राजेळी केळीसाहित्य : ६ पिकलेली राजेळी केळी, २ वाट्या गूळ, २ वाट्या नारळाचे दूध, २ वाट्या ओल्या नारळाचा चव, १ चमचा खसखस, जायफळ, वेलची पावडर स्वादाकरिता.

कृती : खसखस थोडी भाजून घ्यावी. त्यात खवलेले खोबरे आणि गूळ घालून घट्ट होईपर्यंत हलवावे. त्यात जायफळ व वेलची पावडर घालावी.

पिकलेली राजेळी केळी सोलून घ्यावीत. मध्ये उभी चीर द्यावी. त्यात वरील चव भरावा. एका पसरट भांड्यात भरलेली केळी ठेवावीत. त्यावर नारळाचे दूध व उरलेला चव घालावा. मंद आचेवर झाकण ठेवून शिजत ठेवावे. सर्व बाजूनी गुलाबी रंगाची झाल्यावर शिजली असे समजावे.