भानोलेसाहित्य : भाजलेल्या चण्याच्या डाळीचा भरडा (जाडसर रवा) १ वाटी, नारळाचे दूध जाडसर दिड वाटी, लांब चिरलेली कोबी अन बारीक चिरलेला फ्लॉवर, दोन्ही मिळून १ वाटी, हवे असल्यास भाजलेल्या सोड्यांचा भुगा पाव वाटी, आले लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट, एक चहाचा चमचा मीठ, २ अंडी, तेल पाव वाटी, धणेजिरे पावडर, पाव चमचा (चहाचा) हिंग, मोहरी, जिरे, तीळ (२ चमचे तेल मिश्रणात घालण्यासाठी)

कृती : अंडी वगळून बाकी सर्व साहित्य एकत्रित करून चांगले मिसळून घ्यावे. अंडी फेटून त्यातील पाव भाग मिश्रणात घालावा (सोडा घालून नये) पितळेच्या किंवा तांब्याच्या जाड बुडाच्या भांड्यात तेल घालावे. तापवलेल्या तेलात फोडणीला हिंग, मोहरी, जिरे, तीळ घालावे. तडतडू लागले कि त्यावर तयार मिश्रण घालावे.ढवळू नये. मिश्रण घट्ट होत आले कि ते भांडे आधीच तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये ठेवावे (३५०° ते ३७५°) ३० ते ४० मिनिटे साधारण निम्मा वेळ झाल्यावर (१५ ते २० मिनिटे) हळद, मीठ घालून फेटलेले अंडे होत असलेल्या भानोल्यावर ओतावे व पुन्हा भानोले १५ ते २० मिनिटे बेक करावे. छान फुगून येते व हलके होते.

हळदीमुळे अंड्याचा छान रंग येतो व भानोले खुमासदार लागते.