अळू वडीसाहित्य : १२ अळूची पाने, ३ वाट्या बेसन, पाऊण वाटी तळलेला मसाला (सुखे खोबरे भाजून वाटणे), अर्धा चमचा गरम मसाला, २ चमचे लाल तिखट, पाव वाटी गूळ, ४ चमचे लिंबाएवढी चिंच, मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे पावडर

कृती : अळूची पाने स्वच्छ धुऊन लाटण्याने थोडी लाटून वरील शिरा काढाव्यात. एका वाडग्यात बेसन घेऊन त्यात हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, थोडा चिंचेचा कोळ, गूळ, जिरे पावडर व पाणी घालून चांगले एकजीव करावे. साधारण घट्ट होईल इतके पाणी घालावे. अळूच्या पानाला चिंचेच्या कोळाचे पाणी लावून घ्यावे त्यावर बेसनाचे मिश्रण पसरून घट्ट अशी गुंडाळी करावी. आणि मोदकपात्रात २०-२५ मिनीटे वाफवून काढावी.

थंड झाल्यावर पातळ वड्या पाडाव्यात आणि तळाव्यात.