गूळपापडीच्या वड्यासाहित्य : ३ वाट्या कणिक, १ वाटी तूप, दीड वाटी किसलेले खोबरे, पाव वाटी पीठी साखर, अडीच वाट्या चिरलेला गूळ, पाव वाटी डिंक, काजू बदाम, खारीक पूड, वेलची पावडर.

कृती : तुपात डिंक उफलवून घ्यावा. त्याच तुपावर कणिक बदामी रंगावर भाजून घ्यावी. बाजूला काढावी. खोबरे व खसखस बदामी रंगावर भाजावी व बारीक चुरून घ्यावी, डिंक कुस्करून घ्यावा. काजू, बदाम, खारीक पूड घालावी. त्यात पिठीसाखर, वेलची पूड मिक्स करून ठेवावी.


गुळाचा एकतारी पाक करावा, त्यात वरील मिश्रण घालावे. ताटाला तुपाचा हात फिरवून घ्यावा. सर्व मिश्रण ताटात पसरावे, वाटीने थापावे, गरम असताना वड्या पाडाव्यात.