मेथीचे लाडूसाहित्य : ५० ग्रॅम मेथी पावडर, १ मोठी वाटी गाईचे साजूक तूप, १ वाटी भरून किसलेला गूळ (गोड जास्त पाहिजे असल्यास सव्वा वाटी ते दिड वाटी गूळ घ्यावा. अर्धी वाटी बदाम पूड, १ वाटी भरून कणीक, ५० ग्रॅम डिंक, १ चमचा जायफळ पूड​

कृती : मेथी पावडर ४ ते ५ दिवस तुपात भिजत ठेवावी. पाच दिवसानंतर खोबरे, खसखस भाजून पूड करावी. कणीक अगदी बेसनासारखी भाजून घ्यावी. डिंक तळून कुस्करून मेथी पावडरमध्ये मिक्स करावे. खोबरे, खसखस, कणीक, खारीक पावडर, बदाम पावडर, जायफळ पूड सर्व एकत्र करावे. गूळ किसून घालावा, सर्व कोमट असतानाच लाडू वळावेत.