त्रिवेणी लाडूसाहित्य : ३ वाट्या रवा, दीड वाटी बेसन, २५० ग्राम खवा, २ कप केशर मिश्रीत दूध पाणी , ३ वाट्या साखर, पिस्त्याची भरड, १ टीस्पून वेलची पूड, सजावटीसाठी चेरी व चांदीचा वर्खकृती : प्रथम तुपात रवा गुलाबीसर भाजावा. रवा गुलाबी झाला की त्यात १ कप उकळते केशर मिश्रीत दूध पाणी घालावे. गॅस बंद करून रवा परतावा मोकळा झाल्यावर ताटात काढून घ्यावा. बेसन तुपात भाजून घ्यावे. बदामी झाले की रव्याबरोबर ताटात काढावे. त्याच पातेलीत खवा भाजून काढून ठेवावा.

पातेलीत साखर घालून ती भिजेल इतकेच केशर मिश्रीत दूध पाणी घालावे. त्याचा पाक करावा. पाक सतत हलवत रहावा व एकतारी झाला कि त्यात खवा घालून हलवावे. गॅस बंद करून त्यात वेलचीची पूड घालावी. साधारण ३-४ तासांनी किंवा सुकत आल्यावर त्याचे लाडू वळावेत. पिस्त्याच्या चुऱ्यात घोळवून वर्ख लावून चेरीने सजवावे.