१९९० - ९१ च्या रणजी करंडक सामन्यातून समीर दिघे याचे यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पदार्पण झाले. पहिल्याच सामन्यात त्याने गुजरात विरुद्ध १०७ धाव केल्या. संपूर्ण मालिकेत समीरने ७३.३३ च्या सरासरीने ६ डावांत ४४० धावा केल्या. यात एक अर्धशतक आणि दोन शतकांचा समावेश होता. मुंबई संध्यासाठी समीर दिघे एकूण ५८ सामने खेळाला. यात त्याने १७६ झेलबाद केले आणि २३ यष्टिचित केले. १९९९ च्या रणजी करंडक सामन्यात तो मुंबई संघाचा कर्णधार होता. समीरने एकूण ३०५४ धावा केल्या आहेत.

१९६८ साली मुंबईत जन्मलेल्या समीर दिघेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरा उशिराच पदार्पण झाले. १९९९-२००० च्या मोसमात जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा तो ३१ वर्षांचा होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव गडगडला तेव्हा पदार्पणातच नाबाद २२ धावा करत समीर दिघेने डाव तर सावरलाच शिवाय भारताला २-१ ने मालिकाही जिंकून दिली.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते समीरकडून यष्टिरक्षणात ज्या चुका झाल्या त्यामुळे तो पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवडला जाऊ शकला नाही.

२००६ साली त्रिपुरा क्रिकेट टीमचा प्रशिक्षक म्हणून समीरने जबाबदारी स्विकारली. २००८ पर्यंत तो या टीमचा प्रशिक्षक होता. २००७ साली ICC वर्ल्ड क्रिकेट लिगसाठी त्याने हॉंगकॉंगच्या टीमला प्रशिक्षण दिले. या टीमचा तो प्रमुख प्रशिक्षक होता. २००८ मध्ये समीर मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षणासाठीचा प्रशिक्षक होता. २००९ मध्ये समीर दिघे याचे नाव निवड समितीच्या सभासद पदासाठी सुचवले गेले.

संकलन - स्वप्ना राजेंद्र दिघे.