शाही चुरमा लाडूसाहित्य : २ वाट्या बारीक रवा, ४ टेबलस्पून तूप, दिड वाटी पिठीसाखर, १०-१२ बदाम, १०-१२ काजू, १०-१२ वेलची, चार टी.स्पून, चारोळ्या, थोडे दूध व चवीपुरते मीठ, मुटके तळण्यासाठी तूप.​

कृती : प्रथम रवा एक टेबलस्पून तूप व चवीपुरते मीठ घालून मिश्रण रवाळ करावे मग दूध व थोडे पाणी घालून घट्ट भिजवावे. नंतर १० मिनिटांनी त्याचे लहान गोळे,घट्ट मुटके करून मंद गॅसवर लालसर तळून घ्यावे, मुटके गरम असतानाच मिक्सर मधून बारीक करून घ्यावेत व चाळून घ्यावेत. ताटात तूप घेऊन त्यात पिठीसाखर टाकून चांगले फेसावे. त्यात वरील मिश्रण व काजू, बदाम, चारोळी, व वेलची यांची पावडर घालावी. नंतर लाडू वळावेत. लाडू वळताना लाडवाला बेदाणा अगर चेरी लावावी.