चिंबोरीचे कालवणसाहित्य: सहा चिंबोऱ्या (चांगल्या साफ केलेल्या), तीन कांदे, एक मोठी वाटी ओले खोबरे १५-१८ लसूण पाकळ्या, ३ इंच आले, २ ओल्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, तेल हिंग, एक माध्यम बारीक चिरलेला टोमॅटो

कालवणाची कृती : एका पसरट भांड्यात एक मोठी पळी तेल घाला. तेल गरम होताच त्यात एक चिमूट हिंग घाला. मरीनेट केलेल्या चिंबोऱ्या घाला, लगेचच बारीक चिरलेला एक टोमॅटो व नांग्यांचा रस घाला मग आचेवर ८-१० मिनिट परता तेल सुटू लागले की कांदा खोबऱ्याचे वाटण व चवीप्रमाणे मीठ (लक्षात ठेवा चिंबोऱ्यांना आधी मीठ घातलेले आहे) घाला व परत चांगले ५ मिनिट परता व आवडीप्रमाणे पाणी घालून नीट हलवून घ्या. माध्यम आचेवर ७-८ मिनिट उकळी येऊ द्या.

झाले तयार झणझणीत व चमचमीत चिंबोरीचे कालवण. त्यावर कोथिंबीर घाला व सर्व्ह करा.

टिप: चिंबोऱ्या साफ करण्यापूर्वी त्या जिवंत असताना त्यांना चालू नळाखाली नीट धुवून घ्या म्हणजे पोटाला बाधत नाही.