खिम्याच्या वड्यासाहित्य : खिमा पाव किलो, २ कांदे, आलं-लसूण पेस्ट, २ अंडी, दही अर्धी वाटी, १ बटाटा, हळद, तिखट, मीठ, सीकेपी मसाला एक चमचा, तेल एक वाटी, थोडी कोथिंबीरकृती : खिमा धुवून त्याला हळद, तिखट, मीठ, सीकेपी मसाला, आलं-लसूण पेस्ट, दही चोळून ठेवावे. कांद्यावर परतून खिमा कुकरमध्ये शिजवून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात मोकळा होईपर्यंत परतावा. थोड्या तेलात कांदा (उभा बारीक चिरलेला) व बटाट्याच्या उभ्या फोडी तळून घ्याव्या.


पसरट बुडाच्या पातेल्यात तेल लावून खिमा हलक्या हाताने पसरावा. २ अंडी मिक्सरमधून फेटून घ्यावी व त्याची बारीक धार खिम्यावर ओतावी. हळूहळू अंड्याचे मिश्रण खाली झीरपेल. वरती डिप फ्राय केलेला कांदा व बटाट्याचे चिप्स पसरावे. कोथिंबीर घालून गॅसवर सेट करायला ठेवावे. १०-१५ मिनिटात वड्या तयार. चौकोनी कापून गरम गरम वड्या सर्व्ह कराव्यात.