खिम्याचे पॅटीससाहित्य : अर्धा किलो खिमा, ३ कांदे, १ टोमॅटो, हळद अर्धा चमचा, २ चमचे लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, १ इंच आलं, ७/८ लसूण पाकळ्या, कोथिंबीर, पुदिना ( लवंग, दालचिनी व काळी मिरी प्रत्येकी एक फोडणीकरिता), हिंग, मीठ चवीपुरते, तेल, २ चमचे धणे, अर्धा चमचा, बडीशेप


कव्हरसाठी : बटाटे अर्धा किलो, पाव चमचा मिरे पावडर, चवीपुरते मीठ, २ अंडी, अर्धी वाटी ब्रेड क्रम्स, १ चमचा कॉनफ्लोअर

कृती : प्रथम खिमा स्वच्छ धुवून घ्यावा. लसूण, थोडा कांदा, टोमॅटो, धणे, बडीशेप, कोथिंबीर व पुदीना वाटून घ्यावा. खिम्याला हळद, तिखट, गरम मसाला, वरील वाट्णव मीठ लावून ठेवाव. एक भांड्यात २/३ चमचे तेलावर लवंग, दालचिनी, काली मिरी, हिंग टाकून त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा गुलाबी रंगावर झाला कि त्यात मॅरिनेट केलेला खिमा टाकून परतायचे थोड पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवून व झाकणात पाणी घालून खिमा चांगला शिजू द्यावा. नंतर अगदी कोरड्या होऊ द्यावा.

बटाटे उकडून स्मॅश करावे. त्यांत चवीपुरते मीठ व मिरीपूड घालून मळून घ्यावे. अंड फेसून त्यात मीठ व मिरीपूड घालून मळून घ्यावे. ब्रेडक्रम्समध्ये १ चमचा कॉनफ्लोअर मिक्स करावे. बटाट्याची पारी करून त्यात वरील खिम्याचा छोटा गोळा भरून पारी बंद करावी. पॅटीस ब्रेडक्रम्समध्ये घोळवून तयार केलेल्या अंड्यात बुडवून प्रथम गरम केलेल्या तेलात मंद आचेवर डीप फ्राय करावेत. (ब्रेडक्रम्समध्ये थोड कॉनफ्लोअर मिक्स केल्यामुळे अंड्याला जो फेस येतो तो येत नाही.)

पुदिन्याची चटणी व सॉसबरोबर पॅटीस सर्व्ह करावेत.