पडवळाची वाल घालून भाजीसाहित्य : पडवळ अर्धा कि., १ वाटी मोड आणून सोललेले वाल, १ वाटी कांदा, हिरव्या मिरच्या ६ ते ७, आले लसूण पेस्ट १ चमचा, हळद, गूळ, धणे जिरे पावडर, तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मीठ, ओले खोबरे, कोथिंबीर.

कृती : पडवळाच्या पातळ चकत्या कराव्या. कोवळ्या बिया असतील तर त्या घ्याव्या. वालाला मोड आणून सोलून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल घालून तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी व तडतडल्यावर कढीपत्ता घालावा बारीक चिरलेला कांदा घालून लालसर झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट १ चमचा घालावी जरा परतून त्यात वाल घालावे व चांगले सवताळून घ्यावे. त्यावर हळद, जिरेपूड घालून थोडे पाणी घालावे. भांड्यावर झाकण ठेवावे व त्यावर पाणी घालून ठेवावे. थोड्या वेळात वाल शिजल्यावर भाजी घालावी व परतावी भाजी शिजत आल्यावर त्यात आपल्या आवडीनुसार गूळ व मीठ घालावे. भाजी शिजल्यावर त्यात खोबरे व कोथिंबीर घालावे पाणी ठेवू नये.


टीप : अशा प्रकारे फरसबी व कारल्याची भाजी करतात.