साहित्य : १ वाटी वालाची डाळ, १ मध्यम कांदा, हिरव्या मिरच्या, १छोटा चमचा जिरे, मूठभर कोथिंबीर, हिंग चिमूटभर, पाव चमचा हळद, चवीपुरते मीठवालाच्या डाळीचे तिखट वरण

कृती : वालाची डाळ धुवून थोड्या पाण्यात एक तास भिजत घालावी. त्यात हिंग, हळद घालून चांगली शिजवावी. शिजल्यावर डाळ मोडून घ्यावी. कांदा, मिरची, जिरे व कोथिंबीर यांचे वाटण डाळीला लावावे. वाटीभर पाणी घालावे व चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित उकळवावे वरून कोथिंबीर घालावी.