नारळीभातसाहित्य : १ वाटी बारीक तांदूळ, १ वाटी नारळ, १ वाटी वरपर्यंत भरून चिरलेला गूळ, ३ चमचे साजूक तूप, १ चमचा बेदाणे, १ चमचा बदामाचे काप, दोन वेलची, दोन लवंगा, चिमूटभर मीठ, नारळाचे दूध काढण्यासाठी पाणी.
तयारी : तांदूळ धुवून निथळत ठेवावे. नारळ खवणून त्याचे तीन वाट्या दूध काढावे.

कृती : जाडबुडाच्या भांड्यात १ चमचा तूप घालून भांडे गॅसवर ठेवावे. तूप कडकडल्यावर त्यावर वेलची व लवंगा ठेचून घालाव्या. त्यावर धुतलेले तांदूळ घालून परतून घ्यावे. नंतर ३ वाट्या नारळाचे दूध घालून परतून घ्यावे. भात शिजवून घ्यावा. कणी मोडताच त्यात १ वाटी भरून गूळ घालावा. भात व गूळ एकत्र करावा. त्यात वेलची-जायफळ पावडर व बेदाणे आणि बदामकाप घालून दोन चमचे तूप घालून मंद आचेवर ठेवावा. गूळ विरघळेपर्यंत अधून मधून भात सारखा परतावा. गॅसवर तवा ठेवून भांडे मंद गॅसवर १० मिनिटे ठेवावे. नारळी भात तयार.​